तंत्रज्ञान आणि विचारांची पद्धत
भौतिकी, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्रातले अनेक तज्ञ आजच प्रयोगांचे निष्कर्ष काढायला आणि समजून घ्यायला इलेक्ट्रॉनिक तर्कशास्त्राची मदत घेत आहेत. समाजशास्त्री आणि अर्थशास्त्री संगणकांशिवाय कामे करू शकत नाही आहेत. मानव्यशास्त्री, विचारवंत आणि सर्जनशील लेखकांना आज तरी या यंत्राचा फारसा वापर करता येत नाही. पण हे लवकरच बदलेल, कारण संगणकाने मजकुराचे संपादन करणे कागद-लेखणी वा टंकलेखकाने तसे करण्यापेक्षा …